राज्यात गारवा वाढणार

पुणे : पाच महिन्यानंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाल्यानंतर तापमान कमी होऊन रात्री गारवा जाणवू लागला आहे, त्यातच आता हिमालयाच्या परिसरात हिमवृष्टी सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत राज्यातील गारवा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, बुलबुल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, ते सध्या बांगलादेश आणि लगतच्या किनारपट्टीवर आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या मालिकांमुळे यंदा पाऊस लांबला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाळी स्थिती होती, त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश भागांत कोरड्या हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट होत आहे. किमान तापमानात घट झाल्याने अनेक भागांत सध्या रात्री थंडीचा अनुभव मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये सध्या सर्वात कमी १५५ अंश सेल्सिअस किमान तापमान आहे. मुंबई, रत्नागिरी, सातारा, गोंदिया, उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, अलिबाग, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ येथील किमान तापमान सरासरीच्या जवळ असल्याने तेथेही रात्री गारवा जाणवतो आहे. पहाटेच्या वेळी अनेक भागांत धुके दिसून येत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानातही घट झाली आहे. राज्यातील किमान तापमानात घट होत असतानाच सध्या हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढतो आहे. या दोन्ही भागातून थंड चारे येत्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीत बाद होणार असल्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये 'मुलबुल'चे १० बळी पश्चिम बंगालमध्ये 'बुलबुल' चक्रीवादळाने १० बळी घेतले असून, २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत, चक्रीवादळामुळे कोलकात्यासह अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.


Popular posts
कनिका आणि करोना: 900 पथकांमध्ये 9000 लोक करताहेत काम
उच्च न्यायालयाच्या आदेशाचीच बनावट प्रत,न्यायालयाकडून गंभीर दखल ; फौजदारी कारवाईचे आदेश
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना जंतू संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जनता करफ्यूच्या केलेल्या आवाहनाचे पालन करून सायंकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव