मधुमेह हा विकार आता सामान्य व्हायला लागला आहे आणि त्याबाबतीत भारताची स्थिती फार गंभीर झालेली आहे. कारण इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन या संस्थेने केलेल्या एका पाहणीत भारतात २०३० सालपर्यंत दहा कोटी मधुमेही असतील असा निष्कर्ष निघाला आहे. हा मधुमेह हा मोठ्या माणसाचा विकार आहे असा आपला समज असतो, परंतु आपल्या देशात सध्या लहान मुले या विकाराला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. टाईप-१ डायबेटिस या मधुमेहाचे दहा लाख बालरुग्ण आपल्या देशात आहेत. हा लहान मुलांतला मधुमेह इन्शुलिन्सचा वापर न केल्यास घातक ठरू शकतो. या विकाराचा त्रास १० ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना अधिक प्रमाणात होतो. ० ते ४ या वयोगटात या विकाराचा त्रास होत नाही. परंतु ४ ते १० या वयातील मुलांना त्यातल्या त्यात कमी, परंतु त्रास होतो. साधारणपणे फळे कमी खाणे, भाज्या न खाणे, चरबीचे अधिक प्राशन आणि अनारोग्यकारक आहार घेणे यामुळे या
आरोग्य -1(लहान मुलांतील मधुमेह... )