आरोग्य-2(लहान मुलांतील मधुमेह... )

मुलांना मधुमेह होतो. या गोष्टी टाळल्या तर लहान मुलाचे अशा विकारांपासून सुटका होऊ शकते. लहान मुलांमध्ये मधुमेहाचा प्रादुर्भाव होत आहे याची खूण काय, असा प्रश्न विचारला जातो. मात्र त्याच्या काही खुणा आहेत. लहान मूल अधिक पाणी प्यायला लागले, वारंवार लघवीला जायला लागले, त्याचे वजन वाढले आणि त्याला वारंवार त्याच्या भूक लागायला लागली की, त्याचे रक्त आणि लघवी तपासून बघावी. पालकांपैकी कोणाला मधुमेह असेल तर ही चाचणी जरूर करावी. मुळात त्याला मधुमेह होऊच नये यासाठी खालील दक्षता घ्यावी. त्याच्या वजनावर नियंत्रण ठेवावे, वारवार वजन तपासून बघावे - आपले मूल खेळामध्ये, व्यायामामध्ये किंवा जास्त हालचाली होतील अशा कोणत्याही उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असा कटाक्ष ठेवावे - मुलाला भाज्या आणि फळे खाण्यास प्रोत्साहन द्यावे - जंकफूड खाण्यापासून परावृत्त करावे - दोन जेवणाच्या मध्ये हलका आहार घेतल्यास साखरेचे प्रमाण संतुलित राहते - योगासने आणि ध्यानधारणा या गोष्टी मधुमेहापासून बचाव करतात हे लक्षात ठेवावे.