लातूर : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती संपूर्ण देशभरासह लातूर जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली . त्यावेळी लातूर शहरात विविध उपक्रम शिवप्रेमी नागरिकांनी राबवले त्यात सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था सहकारी संस्था शासकीय कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .शहरांमध्ये शिवप्रेमी नागरिकांनी भव्यदिव्य असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते त्या वेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी संबंध शहर दणाणून गेले होते . शिवजयंती मध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासूनच शहरातील तरुणांसह सामान्य नागरिक शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळा परिसरात गर्दी करीत होते. विविध सामाजिक संघटना सह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही या ठिकाणी अभिवादन करण्यास हजेरी लावली होती.
लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.