तपासाबाबत राज्य सरकारची खेळी!

 मुंबई : एल्गार परिषद आणि भीमा- कोरेगाव ही दोन स्वतंत्र प्रकरणे असल्याची भूमिका मांडत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणांच्या तपासाबाबत नव्या खेळीचे संकेत दिले. एकीकडे, भीमा- कोरेगाव प्रकरणाचा तपास राज्य सरकारच करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर दुसरीकडे, 'एल्गार'चा तपास सरकारची खेळी! 'एनआयए'कडे सोपवून आंबेडकरी चळवळीस नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणात पोलीस दलाचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला